“बेस्ट” संप सुरूच, सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल.

71

मुंबई : विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासन कामगार संघटनांच्या बैठकां झाल्या परंतु काही हि तोडगा निघाला नाही. शिवसेनेनं या संपातून काढता पाय घेतल्याने संपात फूट पडली आहे. मंगळवारी संध्याकाळी आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेने संपला दिलेला पाठिंबा काढून घेतला.