दिल्लीत उद्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन; अभिजीत दीपके यांची उपस्थिती; अधिकृत नियमावली जारी

67

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत उद्या एक मोठे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारे आंदोलन पाहायला मिळणार आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने दिल्लीत उद्या (शनिवारी) भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने अधिकृत मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जारी करण्यात आली असून, आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

या आंदोलनाचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे, सामाजिक-राजकीय विश्लेषक आणि कॉकरोच जनता पार्टी’ संस्थापक अभिजीत दीपके हे देखील या आंदोलनाला विशेष रूपानं उपस्थित राहणार आहेत.

पक्षाकडून अधिकृत नियमावली आणि सूचना जारी

आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी काही कडक आणि महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

शिस्तीचे पालन: आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या आचारसंहितेचे पालन करावे.

शांततापूर्ण मार्ग: कोणतेही हिंसक वळण न लागता प्रशासनाला सहकार्य करत आंदोलन लोकशाही मार्गानेच व्हावे.

स्थानिक नियोजन: दिल्लीतील आंदोलनाच्या मुख्य ठिकाणी पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना विशिष्ट मार्ग आणि वेळेचे नियोजन करून देण्यात आले आहे.

अभिजीत दीपके यांच्या उपस्थितीने आंदोलनाला धार

या आंदोलनामध्ये अभिजीत दीपके यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. डिजिटल मीडिया आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे दीपके या आंदोलनात सहभागी होऊन कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुणांचा या आंदोलनातील सहभाग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीतील हे आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि विविध मुद्द्यांवर होणार आहे, या आंदोलनाबाबत कमालीची उत्सुकता असून, उद्या होणाऱ्या या गर्दीमुळे दिल्ली प्रशासनाने आणि पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

पुढील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी युवा प्रभाव न्यूज व्हॉट्स अप ग्रुप मध्ये जॉइन व्हा. 

👇👇👇