राज्यात उष्णतेच्या लाटेसह वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकट आहे. 11 मे रोजी देखील कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असेल.
तसेच 13 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. सोमवारी 11 मे 2025 रोजी राज्याचे एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
कोकण
कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होणार आहे. अशातच अनेकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर परिसरात सोसायट्यांचा वारा, विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज जारी करण्यात आला.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार असून कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा जारी करण्यात आला नाही. अहिल्यानगरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच दुपारी उष्णतेची अधिक तीव्रता जाणवणार आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. लातूर आणि धाराशिव परिसरात वाऱ्याचा वेग वाहण्याची शक्यता आहे. विजांसह पावसाचा गडगडाट राहून यलो अलर्ट जारी केला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली परिसरात अवकाळी पावसाची अधिक शक्यता आहे.
विदर्भ
विदर्भात उष्णतेचा पारा हा 44 अंशापार असून उन्हाचे चटके सोसावे लागणार आहे. अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे. पूर्ण विदर्भात वादळी वापसाचा इशारा नसून, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाचं सावट आहे.








