राज्यातील सर्व महामार्गावर “ट्रॅफिक जाम”; प्रवासी अडकले, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची धावपळ…

107

Mumbai : राज्यातील सर्व महामार्गावर (Highway) प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जवळ जवळ 5 KM लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हजारो वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर भयानक वाहतूक कोंडी झाली आहे.

नगर मनमाड महामार्गावर (Highway) पुणतांबा फाट्यावर वाहतुक कोंडी झाली आहे. तर, नांदेड – हैदराबाद आणि नांदेड – बिदर या राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर (Highway) मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणात आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर आहेत. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर वाहनांची संख्या वाढली आहे. परतीच्या प्रवासात पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. नगर मनमाड महामार्गावर पुणतांबा फाट्यावर वाहतुक कोंडी झाली. कोपरगावच्या पुणतांबा फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवासी तीन ते चार तासांपासून वाहतूक कोंडीत अडकले. नगर मनमाड महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

रविवार आणि लग्नसराईमुळे शहरातसह नगर मनमाड महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली. सीईटी परीक्षार्थींनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला. अनेक विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची मोठी  धावपळ सुरू आहे.