ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती.

61

मुंबई : ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्टेशन दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्व:त मान्यता दिली आहे.  याबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास निश्चितच मदत होईल असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.