“मायावती किन्नरपेक्षा वाईट” भाजपच्या महिला आमदाराची जीभ घसरली..

145

नवी दिल्ली – भाजपचे नेते त्यांच्या उदंड बोलण्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. त्यामुळे हि सत्तेची नशा आहे कि, त्यांची प्रवृत्ती ह्याबद्दल त्यांच्यावर नेहमीच चहुबाजूनी टीका होत असते. आता भाजपच्या एक महिला आमदार साधना सिंह यांची जीभ घसरली आहे. साधना सिंह यांनी बसपा राष्ट्रीय अध्यक्षा मायावतींवर केलेल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानामुळे राजकारणात गोंधळ उडाला आहे. उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथून आमदार असलेल्या साधना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये साधना सिंह यांनी मायावतींवर एकानंतर एक अतिशय वादग्रस्त व अर्वाच्च शब्दात टीका केली. सोबतच, मायावतींना किन्नरापेक्षा हि वाईट असे म्हटले आहे. गेस्ट हाऊस घोटाळ्यात मायावतींचे चीरहरण झाले होते तरीही त्यांनी आघाडी केली, अशी टीका साधना सिंह यांनी केली.

iRiFTx2VptMhKQz7 

आमदार साधना सिंह यांनी मायावतींवर अनेक स्वरुपाच्या टीका केल्या. एका जाहीर सभेत भाषण करताना त्या म्हणाल्या, “आम्हाला वाटते की माजी मुख्यमंत्री महिला किंवा पुरुष हे दोन्ही नाहीत. त्यांना आपल्या सन्मानाशी काहीच घेणे-देणे नाही. द्रौपदीचे सुद्धा चीरहरण झाले होते. द्रौपदीने त्या चीरहरणाचा बदला घेतला होता. त्या एक स्वाभिमानी महिला होत्या. आजची एक महिला आहे जिचे सर्वच काही लुटले गेले आणि तरीही खुर्ची मिळवण्यासाठी तिने आपले मान-सन्मान विकले. अशी महिला असलेल्या मायावतींचा आम्ही तिरस्कार करतो. त्या नारी जातीवर कलंक आहेत.” यानंतरही साधना सिंह यांनी इतक्या निच्च पातळीवर जाऊन टीका केली की ती सांगणे सुद्धा कठिण आहे.