नालासोपारा नव्हे फक्त “सोपारा” रेल्वे स्थानक पाहिजे : राजाराम खरात

104

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर नालासोपारा रेल्वे स्थानक आहे. पूर्वी पासून सदर स्टेशनला “सोपारा”च म्हटले जायचे. म्हणून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव फक्त सोपारा असेच करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन नेते व आरपीआय (आरके) पक्षाचे अध्यक्ष राजाराम खरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्राकडे पाठवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

सोपारा हे हजारो वर्षांपासून बंदर म्हणून विकसित होते. समुद्रमार्गे होणारा व्यापार ह्या बंदरातून होत असे. तसेच महान सम्राट अशोक यांचे सुपुत्र महिंद्र आणि सुकन्या संघमित्रा ह्याच सोपारा बंदरातून बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेला गेले होते. त्यामुळे बौद्ध धर्मीयांमध्ये ह्या नगराला मोठे महत्व आहे. त्यामुळेच हजारो वर्षाचा इतिहास जपणाऱ्या ह्या नगरातील रेल्वे स्थानकाच्या नावातील नाला ह्या शब्ध प्रयोग काढून फक्त “सोपारा” ठेवावा व त्यासाठी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी राजाराम खरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.