“हमारा नेता कैसा हो, राकेश शेट्टी जैसा हो,” घोषणा व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला कार्यालय उदघाटन सोहळा.

लोकसेवा हाच मुख्य उद्देश, पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी उचलणार : राकेश शेट्टी.

487

मुंबई: कार्यकर्त्याच्या प्रचंड उत्साह व जल्लोषपूर्ण वातावरणात राकेश शेट्टी यांच्या भांडुप येथील “काँग्रेस जन संपर्क कार्यालयाचा” उदघाटन सोहळा पार पडला. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन पार पडले. ह्यावेळी बोलताना राकेश शेट्टी यांनी काँग्रेस पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पडणार असा ठाम विश्वास व्यक्त करत लवकरच मुलुंड येथे देखील कार्यालय उघडणार असल्याची घोषणा देखील केली. ह्यावेळी कृपा शंकर सिंग यांनी आपल्या भाषणात राकेश शेट्टी यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला, त्यांच्या कामाची प्रशंसा केली, तर श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देखील देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ह्यावेळी कार्यकर्ते देत असलेल्या घोषणांमुळे सर्वच राजकीय पक्षामध्ये अस्थिरता पसरली आहे. ” हमारा नेता कैसा हो ” त्याचबरोबर “हमारा खासदार कैसा हो, राकेश शेट्टी जैसा हो” ह्या घोषणेमळे सर्व चित्र स्पष्ट दिसत असल्याने सगळीकडेच चर्चाना उधाण आले आहे. राकेश शेट्टी यांचे आक्रमक नेतृत्व व त्यांची अफाट लोकप्रियता त्यामुळे विरोधकांसमोर त्यांचे तगडे आव्हान असणार आहे. विद्यार्थी व युवकांचा प्रचंड सहभाग असलेली बाईक रैली काढून राकेश शेट्टी यांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले. 

राकेश शेट्टी यांनी काँग्रेस मध्ये कार्यरत झाल्यापासून पक्षातीलच विरोधकानी अनेक वेळा त्यांचा पत्ता कट केला. त्यांच्या बद्दल वरिष्ठ पदाधिकारी आणि पक्ष नेतृत्व यांच्या कडे चुकीची माहिती पोहचवली. त्यामुळे डगमगून न जाता लोकसेवा करत राहणार. पक्ष जी जबाबदारी देईल ती तन मन धनाने पार पाडणार. असा ठाम विश्वास राकेश शेट्टी यांनी ह्यावेळी दिला.

ह्या उदघाटन सोहळ्यासाठी जेष्ठ काँग्रेस नेते बी. के. तिवारी, माजी नगरसेवक दत्ताजी कराडकर, विजय पांडे, बाबुलाल सिंह, आनंद दुबे, मनोज दुबे,दयाशंकर सिंह, सचिन सिंह, बिपीन विचारे, यासोबत यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.