नवी दिल्ली – पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेला तरुण नेता हार्दिक पटेल याला २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांमधील जागावाटपही जाहीर झाले आहे.,
वाराणसी या नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी हार्दिक पटेलला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. सपा बसपाची पत्रकार परिषद संपते ना संपते हार्दिक पटेल वाराणसीला पोहचला आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी वाराणसीमधून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत मोदी यांनी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता.
नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी सप आणि बसप एकत्र आले आहेत.वाराणसीमधून सपा बसचा उमेदवार देण्यापेक्षा इतर ठिकाणच्या महत्त्वपूर्ण नेत्याला नरेंद्र मोदींविरोधात उभे करण्यासाठी दोन्ही पक्षात एकमत झाले आहे. त्यामुळेच हार्दिक पटेल याच्या नावाचा विचार केला जात आहे. हार्दिक पटेल मागील तीन वर्षांपासून सातत्याने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका मांडत आहेत. त्याचबरोबर देशाअंतर्गत दौरे करून तो नरेंद्र मोदी विरोधात जनमत तयार करत आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर हार्दिक ला वाराणसी मधूनच उमेदवारी देण्यात येण्याची दाट शक्यता आहे.








