राष्ट्रवादीने केले १८ नगरसेवकांना बडतर्फ…

115

अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलत भाजपाला साथ देणाऱ्या १८ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ही कारवाई केली आहे.

१८ नगरसेवकांशिवाय जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी त्या १८ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पण त्यांना समाधानकारक उत्तर न देण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

पक्षादेशडावलून भाजपाला मदत केल्याने, भाजपचा महापौर सत्तेत विराजमान झाला होता. ह्या अप्रत्यक्ष युती मुळे राष्ट्रवादी व भाजप चे सख्य याबाबत सर्वत्र चर्चा घडत होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ची विश्वासार्हता पणाला लागली होती.