गोवा: काँग्रेस सेवादलच्या वतीने मासिक झेंडावंदन करण्यात आले. गोवा राज्याचे प्रभारी व सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव राकेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तमाम सेवादलाच्या कार्यकर्ते सदर प्रसंगी उपस्थित होते.नुकताच राकेश शेट्टी यांच्या मार्गदर्शनात गोवा सेवादल युनिटने राष्ट्र पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे राकेश शेट्टी यांच्या नेतृत्व गुणाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.









