मुंबई – आलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा व्यंगचित्रातून टीकास्त्र चालवले आहे. “हुद्दा घालवला व खड्डा कमावला” असे शीर्षक असलेले व्यंगचित्र राज ठाकरे यांनी प्रकाशित केले आहे. सीबीआयमधील आलोक वर्मा प्रकरण गाडून टाकता टाकता नरेंद्र मोदी खोदलेल्या खड्ड्यात स्वतःच पडले आहेत, असे राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले आहे.
त्याच बरोबर राज्य सरकारच्या दबावामुळे नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्यात आले. त्यावरून त्यांनी “राग आणीबाणी” चा प्रश्न उपस्थित केला आहे.








