MHADA Pune : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जवळ 792 घरांची लॉटरी निघणार, अर्ज प्रक्रिया सुरू

83

पुणे  : घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) मोठी बातमी दिली आहे. पुणे-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे ७९२ सदनिकांसाठी नवीन लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही घरे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या अगदी जवळ आहेत. या घरांसाठी अधिकृत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

ताथवडे हा परिसर सध्या पुण्यातील वेगाने विकसित होणाऱ्या आयटी आणि शैक्षणिक केंद्रांपैकी एक आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि हिंजवडी आयटी पार्क या दोन्ही ठिकाणांहून हा प्रकल्प जवळ आहे. म्हाडाच्या या गृहनिर्माण योजनेत ७९२ सदनिकांचा समावेश असून, त्या प्रामुख्याने मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी म्हाडाने निश्चित केलेल्या उत्पन्न गटाच्या अटी लागू असतील. यामध्ये प्रामुख्याने अल्प उत्पन्न गट (LIG): ज्यांचे वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादेत आहे.