नवी दिल्ली- भारतीय चित्रपट क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मृणाल सेन (९५) यांचे रविवारी निधन झाले. २००५ मध्ये त्यांना फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
‘रातभोर’ या १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९६० मध्ये प्रदर्शित ‘नील आकाशेर नीचे’ या चित्रपटामुळे मृणाल सेन यांची दिग्दर्शनाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली होती. ‘बाइशे श्रावण’मुळे त्यांचे नाव जागतिक पातळीवर गाजले. सेन यांचे सर्वाधिक चित्रपट बांगला भाषेत आहेत. १४ मे १९२३ रोजी फरीदपूरमध्ये सेन यांचा जन्म झालेल्या सेन यांना २० राष्ट्रीय, १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.








