महाराष्ट्राचे सरकार, फुले-आंबेडकरांना विसरले.

83

मुंबई:फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अशा घोषणा उठता बसता देणारे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकारला चक्क फुले आंबेडकरांना विसरले आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयानं प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकांमधील नोंदीमध्ये महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना विसरल्याने सरकारवर चहू बाजूने टीकेचे झोड उठली आहे. या दिनदर्शिकांचं वाटप राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात करण्यात आलं आहे.

28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी असते तर आणि 6 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दोन्ही तारखांना याबाबत कोणताच उल्लेख ह्या दिनदर्शिकांमध्ये केलेला दिसत नाही.