प्रकाश आंबेडकरांना मिळणार का भुज”बळ”?

106

मुंबई: आज सकाळीच राज्यातील बहुजन समाजातील दोन महत्वाचे नेते भेटल्याने दिवसभर राजकीय बातम्यांना उधाण आले होते. वंचित बहुजन आघाडीचा झंजावात निर्माण करून राज्यभर जाहीर सभांचा धडाका लावून प्रस्थापित राजकीय पक्षाची झोप उडवणारे भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांची वांद्रे इथल्या निवासस्थानी अचानक भेट झाल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. नेमके भेटी मागचे कारण समजू शकले नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीत छगन भुजबळ सामील होतील अशा बातम्या आज दिवसभर रंगत होत्या. असे झाले तर राज्याच्या राजकारणाचा निकाल वेगळाच लागू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.