“खूप त्रास सहन केला रे”: वर्ष २०१८ ची व्यथा राज ठाकरेंनी मांडली.

35

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केलं आहे. ह्या व्यंगचित्रात 2014 ते 2018चा काळ दाखवण्यात आला आहे. या व्यंगचित्रात एक वृद्ध माणूस एका लहान मुलाच्या हातात किल्ली देत असल्याचं पाहायला मिळतंय. “बेटा, खूप त्रास सहन केला रे आम्ही! आम्ही जी चूक केली तशी तू करू नकोस, जबाबदारीनं वागशील ही अपेक्षा”, असा मजकूरही या व्यंगचित्रातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे व्यंगचित्र काढण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळा वर ह्यातून टीका करण्यात आली आहे