मला थंडी वाजत होती, आंबेडकरांनाही थंडी वाजत असेल…

109

उत्तर प्रदेश : देशभरात थंडीचा कहर सुरु आहे. उत्तरेकडील राज्यात तर थंडीची लाट सुरु असून अनेक राज्यांमध्ये पारा एक आकडी तापमान दाखवत आहे.
या कडाडत्या थंडीत, ‘मला थंडी वाजत होती. त्यामुळे आंबेडकरांनाही थंडी वाजत असेल असं मला वाटलं. याच कारणामुळे मी त्या पुतळ्यावर ब्लँकेट पांघरले आणि त्याच्यासमोर शेकोटी पेटवली.’ म्हणून उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चक्क ब्लँकेट पांघरले आणि त्याच्यासमोर शेकोटी पेटवल्याचा प्रकार मुज्जफरानगर येथील कठैली येथे घडला आहे. ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहितीही समोर आली आहे.

सकाळी स्थानिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात धाव घेतली असता या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. पोलीसांना काही तासांमध्येच आंबेडकरांच्या पुतळ्यावर बँकेट पांघरणाऱ्याला अटक केली. मात्र तो मनोरुग्ण असल्याचे समोर आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले आहे.

पोलिसांनी या व्यक्तीला अटक करुन चौकशी केल्यानंतर असे समजले कि, ‘मला थंडी वाजत होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनाही थंडी वाजत असेल असं मला वाटलं. याच कारणामुळे मी त्या पुतळ्यावर ब्लँकेट पांघरले आणि त्याच्यासमोर शेकोटी पेटवली.’ असा जबाब या व्यक्तीने पोलिसांना दिला आहे.