बंगळुरू: “जयकांत शिकरे” फेम अभिनेते प्रकाश राज “मध्य बंगळुरू” मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. प्रकाश राज यांनी 1 जानेवारीला आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. राज यांनी आपण मध्य बंगळुरूतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली.

या ट्विटच्या शेवटी त्यांनी सिटिझन्स व्हॉईस इन पार्लमेंट असा हॅशटॅग वापरला आहे. या ट्विटमध्ये प्रकाश राज यांचा फोटो आणि आठ विधानसभा मतदारसंघ दिसत आहेत. या आठ मतदारसंघांचा समावेश मध्य बंगळुरू लोकसभा मतदारसंघात होतो.
2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर मध्य बंगळुरू मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून भाजपचे पी. सी. मोहन या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.








