नवी दिल्ली : गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “ज्ञानेश कुमार अब आपकी बारी है, हम आ रहे हैं!” अशा शब्दांत नेहा बोरा यांनी थेट ललकारत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
उद्या, २ ऑक्टोबर (गांधी जयंती) रोजी कॉकरोज जनता पार्टीच्या वतीने देशभरात भव्य आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी ‘चलो मुंबई’ आणि ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दिल्ली येथे जंतर मंतर आणि मुंबई येथे शिवाजी पार्क या ठिकाणी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेत्यांचा आक्रमक पवित्रा: नेहा बोरा यांच्या या इशाऱ्यामुळे आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली असून पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईच्या आणि दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत.
प्रशासनाची धावपळ
नेहा बोरा यांच्या या थेट आव्हानानंतर आणि २ ऑक्टोबरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि मुंबई तसेच देशभरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या या ‘जेल भरो’ आंदोलनाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
– ब्युरो रिपोर्ट, युवा प्रभाव न्यूज








