नाशिक: देशभर गाजत असलेल्या ‘नीट २०२६’ पेपरफुटी प्रकरणाचे कनेक्शन आता नाशिकपर्यंत आले आहे. पेपर लीक करणाऱ्या रॅकेटचे कनेक्शन नाशिकमधील काही व्यक्ती आणि शैक्षणिक संस्थांशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याने खळबळ उडाली आहे.
नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर सीबीआय (CBI) कडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. तपासादरम्यान काही संशयित व्यवहारांचे आणि तांत्रिक पुराव्यांचे धागेदोरे नाशिकमध्ये सापडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एका नामांकित प्रशिक्षण संस्थेशी (Coaching Classes) संबंधित काही व्यक्तींचा या पेपर लीक प्रकरणातील झाले आहे.








