जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन , राकेश शेट्टी करणार शक्तिप्रदर्शन…

कृपाशंकर सिंह यांचे हस्ते होणार उदघाटन..

244

मुंबई: लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक नेते, उत्सुक कार्यकर्ते निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मुलुंड व भांडुप विधानसभा मतदार संघात प्राबल्य असणारे व लोकप्रिय युवा नेते काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव व गोवा राज्याचे प्रभारी राकेश शेट्टी यांनी निवडूणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन रविवारी २७ जानेवारीला होत आहे. त्याचे औचित्य साधून राकेश शेट्टी हे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. विद्यार्थी व युवकांचा लक्षणीय सहभाग असलेली बाईक रॅलीचे नेतृत्व राकेश शेट्टी करणार आहेत.

राज्याचे माजी गृह राज्य मंत्री व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते ह्या कार्यालयाचे उदघाटन होत आहे. ह्यावेळी काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष वेल्लूस्वामी नायडू हे प्रमुख अतिथी असणार आहेत. काँग्रेसचे मुंबई तसेच राज्यभरातील दिगज्ज नेते, सेवादलाचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग, विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात युवा वर्ग ह्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. राकेश शेट्टी हे कामगार नेते असल्यामुळे अनेक कर्मचारी युनियनचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे हजेरी लावणार आहेत.

राकेश शेट्टी हे मुलुंड किंवा भांडुप विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे उत्सुक आहेत. तसेच ईशान्य मुंबई मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यास राकेश शेट्टी हे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असतील अशी चर्चा देखील सुरु आहेत.