देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही: मुख्य निवडणूक आयुक्त

106

नवी दिल्ली – लंडनमधील सय्यद शुजा नामक हॅकरने EVM हॅकिंगबाबत केलेल्या दाव्यांमुळे देशात खळबळ उडाली आहे. EVM हॅकिंगच्या वादानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पुढील निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच घेतल्या जातील असे सांगितले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे.

‘आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरणे सुरुच ठेवणार आहोत. यासाठी राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे सुनील अरोरा यांनी सांगितले आहे.

EVM हॅकिंग प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून, हॅकर सय्यद शुजाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे. सय्यद शुजा याने आपल्याला EVM हॅक करता येत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही. असा दावा देखील त्यांनी ह्यावेळी केला.