काँग्रेसचा मोठा निर्णय; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी…

पश्चिम उत्तर प्रदेशचं नेतृत्त्व ज्योतिरादित्य सिंधियांकडे...

93

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांची काँग्रेसनं उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रियांका गांधींकडेउत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचं नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

प्रियांका गांधी ह्या सक्रीय राजकारणापासून दूर होत्या. कोणतेही पॅड नसताना देखील त्या काँग्रेस कार्यकर्ते व जनतेमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. म्हणूनच अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचं नेतृत्त्व देण्यात आलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आक्रमक प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांची उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तर मध्य प्रदेशमधील काँग्रेसचा सत्ता वापसी मध्ये महत्वाची भूमिका बजावणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. तर वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याकडे हरयाणाची सूत्रं देण्यात आली आहेत.