इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दलित समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपा "चा मेगा-प्लान"

88

नागपूर: मुंबईतील इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपाच्या विजय संकल्प सभेत करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

मागील साडेचार वर्षांत रोहित वेमुलाचे प्रकरण, उत्तर प्रदेशसह विविध राज्यात अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांवर झालेले हल्ले, तसेच आरक्षणाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या अनुचित वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले.

नरेंद्र मोदी सरकार दलितविरोधी असल्याची टीका झाली. त्यामुळेच भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील सत्ता गमवावी लागली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ‘मेगा-प्लान’ तयार केला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेण्यात घेणार आहे,