सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनी अर्थव्यवस्थेला पोषक असे निर्णय घेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला आहे. देश आर्थिक संकटात आहे. ज्या हिंदुत्ववाद्यांनी नरेंद्र मोदींना सत्तेवर आणले, मग देश संकटात असताना, सारे हिंदुत्ववादी कुठे गेले आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे व भारिप चे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मिरज येथे बोलताना केला. तसेच हे सरकार चोर-लुटारुंचे सरकार आहे, असेही ते म्हणाले.

नोटबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका करताना ते म्हणाले, ” केवळ साठ टक्के पैसा सरळमार्गाने परत आला आहे. या नोटबंदीत तब्बल चाळीस टक्क्यांहून अधिक पैसा काळ्याचा पांढरा झाला. तोच पैसा पुढच्या निवडणुकीत ओतला जाईल आणि त्या जीवावर सत्तेचे मनसुबे भाजप बांधत आहे. पुर्वीचे लुटारू होतेच, त्यात आता यांची भर पडली आहे. या लुटारुंच्या व्यवस्थेला किती दिवस पोसणार? या व्यवस्थेने राज्यातील कष्टकरी समाजाला विकासापासून, हक्कापासून वंचित ठेवले. परंतु आता हि व्यवस्था बदलण्यासठी वंचित बहुजन आघाडी सज्ज आहे, सर्वानी एकत्र येऊन हे लुटारूंचे सरकार उलथून टाकू या.”








