मुंबई : मराठा समाजाला देण्यात आलेले 16 टक्के आरक्षण तातडीने रद्द करावे यासाठी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जलील यांनी याचिकेद्वारे केली आहेच .सोबतच मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करण्यात यावा, असेही त्यांनी याचिकेद्वारे म्हटले आहे.
”राज्यातील मुस्लिम आरक्षणावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुस्लिम समाजाला जाणिवपूर्वक डावलले जात आहे. असा आरोपही जलील यांनी केला आहे. शिवाय, ”मुस्लिम समाज आणि यातील काही ठराविक घटकांचे जातीनिहाय सर्वेक्षण करुन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तात्काळ आरक्षण मंजूर करावे”, अशीही मागणी जलील यांनी केली आहे.
मराठा आरक्षणामुळे समाजा समाजात तेढ निर्माण होतेय. मराठा समाजासहीत मुस्लिम समाज, धनगर समाजालाही आरक्षण द्यावे, असेही विधानही जलील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे.








