नवी दिल्ली – सिंघम चित्रपटात राजकारण्याची भूमिका केलेल्या प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर नव्या वर्षाची शुभेच्छा देताना राजकारणात पदार्पणाची घोषणा केली आहे. आगामी 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश राज यांनी जाहीर केले आहे. मतदार संघाबाबत लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगत, “अबकी बार जनता की सरकार..” असा नाराही त्यांनी लगावला आहे.
प्रकाश राज देशातील राजकारणाबाबत रोख ठोकपणे भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राजकारणावर मौन न बाळगता परखड मत मांडणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. प्रकाश राज यांनी अनेक वेळा मोदी सरकारच्या विरोधात तीव्र शब्धात टीकाही केली आहे.








