‘राष्ट्रपती अदिवासी, विधवा त्यामुळे नव्या संसद भवन उद्घाटनास निमंत्रण नाही’ – उदयनिधी स्टॅलीन

152

तामिळनाडू मधील मंत्री आणि डीएमके (DMK) नेते उदयनिधी स्टॅलीन (Udhayanidhi Stalin) यांनी पुन्हा एकदा ‘सनातन धर्म’ कडाडून प्रहार केला आहे. त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या एक अदिवासी विधवा आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांना नव्या संसद इमारतीचे (New Parliament Building)उद्घाटन करताना निमंत्रण दिले नाही. अशा प्रकारे निमंत्रण टाळणे यालाच ‘सनातन धर्म’ (Sanatana Dharma) असे म्हणतात. या टीकेवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उदयनिधी स्टॅलीन यांनी जोर देत म्हटले आहे की, जवळपास 800 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नव्या संसद भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी देशाच्या प्रथम नागरिक म्हणून विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र, सरकारने ते केले नाही. याचे कारण म्हणजे केवळ त्या आदिवासी आणि विधवा महिला आहेत. या गोष्टीतूनच सरकारचा सनातनी विचार कळतो असेही ते म्हणाले. संसद भवनाच्या उद्घाटनासाठी तामिळानाडूतील काही लोकांना निमंत्रण पाठवता आले. पण राष्ट्रपती यांना हे निमित्रण देता आले नाही. हाच सनातन धर्म आहे का? जो आम्हाला पुढे चालवा म्हणून सांगितले जाते. ते मदुराई येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

उदयनिधी स्टॅलिन हे एक एक भारतीय चित्रपट निर्माता, राजकारणी आणि माजी अभिनेता आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी तामिळ फिल्म इंडस्ट्रमध्ये अभिनय केला. दरम्यान, ते राजकारणात आले. त्यांच्याकडे राजकारणाचा मोठा वारसा आहे. त्यांचे आजोबा एम करुनानिधी हे चांगले, लेखक, अभिनेते, निर्माते आणि राजकारणी होते. त्यांचे वडील तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. तर स्वत: उदयनिधी हे तामिळनाडू राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत.