महिला आरक्षण बिल OBC ना गुलाम करणार – ॲड. प्रकाश आंबेडकर 

146

Mumbai : केंद्र सरकारने महिला आरक्षण बिल आणले. परंतु हे बिल आता वादात अडकले आहे. हे बिल ओबीसी विरोधी असल्याचे देशभरात बोलले जात आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ह्या बिलावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने आणलेलं महिला आरक्षण बिल हे अत्यंत दुर्दैवी बिल आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामार्फत शूद्रांची म्हणजे आताच्या ओबीसींची गुलामीतून सुटका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मानाची, अभिमानाची जागा आणि पदवी ओबीसींना दिली. त्याचप्रमाणे संविधानाने ओबीसींना मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान निर्माण केले.

आम्ही या महिला आरक्षण बिलाचे स्वागत करतो परंतु, याच विधेयकामार्फत ओबीसी समाजाला हलाल करण्यात आले आहे. सत्ता ही पुन्हा ब्राह्मण्य आणि क्षत्रिय यांच्यात केंद्रित करणारा हा कायदा आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आतातरी ओबीसींच्या नेत्यांनी जागे व्हावे आणि स्वतःच्या हक्कासाठी लढा द्यावा. आरएसएस आणि भाजपाने देशातील ओबीसींसोबत मोठा धोका केला आहे, हे आता ओबीसींनी ओळखलं पाहिजे. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

धर्माचा रक्षक हा ओबीसीचं आहे. पण, त्याला आता ब्राह्मण्य आणि क्षत्रिय पुन्हा गुलाम करायला निघाले आहेत असे मत प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर व्दारे व्यक्त केले आहे.