Canada : पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके याची हत्या..

131

पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके (Sukhdool Singh aka Sukha Duneke) याची टोळीयुद्धात हत्या झाल्याची बातमी समोर येतआहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सुखदूर आणि त्याच्या साथीदारांचा प्रतिस्पर्धी टोळीसोबत संघर्ष उडाला. यात बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसर, ही घटना कॅनडातील (Canada) विनिपेग (Winnipeg City) शहरात घडली. विविध गुन्ह्यांसाठी तो भारतीय पोलिसांनाही हवा होता. सन 2017 मध्ये हा गुंड बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतातून कॅनडाला पळून गेला होता. त्याच्यावर आतापर्यंत किमान 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत.