अग्रलेख | भिडे नामक प्रवृत्तीला वेसण घालण्याची वेळ..

372

फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते महाराष्ट्राच्या परंपरेला अशोभनीय आहे. विकृत प्रवृत्ती, त्यांना मिळणारे समर्थन आणि सरकारी पातळीवरून मिळणारे अभय यामुळे सध्या महाराष्ट्राचे समाजमन ढवळून निघाले आहे.

संभाजी उर्फ मनोहर भिडे ह्या माणसाने सध्या महाराष्ट्रात जो उन्माद मांडला आहे. तो वादग्रस्त तर आहेच. परंतु निंदनीय देखील आहे. चुकीचा इतिहास सांगून समाजात दुहीची बीजे पेरली जात आहेत. तरुणांची माथी भडकावली जात आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. बरे हे अनेकदा होत आहे. मात्र ह्या भिडे गृहस्थावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणारे मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जाहीरपणे जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. मनोहर भिडे विरोधात गुन्हे दाखल होतात मात्र कारवाई शून्य.

पुन्हा महात्मा जोतीराव फुले, समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत मनोहर भिडे बोलतानाच्या क्लिप व्हायरल होतात. तरीही भिडे ला कुणीही आवर घालत नाही. याचा अर्थ काय लावायचा.? मात्र मनोहर भिडे नामक विकृत प्रवृतीमुळे जाती जाती दुहीची बीजे पेरली जात आहेत. असंतोष वाढत आहे. दंगल सदृश्य परिस्थितीची पायाभरणी केली जात आहे.

मनोहर भिडे हे भीमा कोरेगाव दंगली खटल्यातील प्रमुख आरोपी आहेत. ज्या समयी ही दंगल झाली त्या अगोदर भीमा कोरेगाव च्या आजूबाजूच्या परिसरात ह्याच मनोहर भिडेच्या बैठका झाल्या होत्या असा आरोप बहुजन नेते प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळी केला होता. आणि आजही राज्यभरात सर्वत्र मनोहर भिडेचे कार्यक्रम लावले जात आहेत. रोज वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्या भिडे नामक प्रवृत्ती वर कोणतीही कारवाई केली जात नाहीय. हे महाराष्ट्र राज्याच्या समाजमनाच्या दृष्टीने योग्य नाहीय.

२००९ साली भिडेच्या संघटनेव्दारे जोधा अकबर चित्रपटाचा विरोध करण्यात आला होता. त्यावेळी मिरज, सांगली प्रांतात मोठी दंगल उसळली होती. यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी मनोहर भिडेला रस्त्यावर फोडला होता. त्यांच्या वयाचा आदर करत आता भिडे नामक प्रवृत्तीवर वेसण घालण्याची वेळ आली आहे. राज्य सरकार ह्यावर नक्कीच विचार करेल आणि महाराष्ट्रात शांतता आणि सलोखा आबधित ठेवेल अशी आशा ठेवूया.

– प्रफुल गोरख कांबळे

Editor –In- Chief : www.YuvaPrabhav.com

Email : kampraful@gmail.com

(आपण आपल्या प्रतिक्रिया वरील मेल वर पाठवू शकता. लेखातील मुद्दे आवडल्यास लाईक आणि शेयर करा. जेणेकरून लेखप्रपंच सार्थकी लागेल…)

“कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.” – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

www.YuvaPrabhav.Com हे एक स्वतंत्र मराठी वेब न्यूज पोर्टल आहे. आपण दिलेल्या लाईक, शेयर आणि क्लिक वर गुगल कडून प्राप्त झालेल्या निधी वर YuvaPrabhav.Com सुरू आहे.

👉बातमी शेयर करा..

👉 Google Play Store वरून YuvaPrabhav चे मोबाईल application डाऊनलोड करा.

👉 आम्हाला ट्विटर, फेसबुक वर फॉलो करा.

👉 WhatsApp News group मध्ये सामील व्हा.

👉 आम्हाला सहकार्य करण्यासाठी YuvaPrabhav@gmail.Com वर संपर्क साधा.

स्वतंत्र पत्रकारितेला सहकार्य करा. – आपला प्रफुल कांबळे.