टोमॅटोची किंमत 200 रुपये प्रति किलो, पुन्हा नागरिकांच्या खिश्याला कात्री

175

Mumbai  : देशभरात टोमॅटोची किमती वाढल्या आहेत. सद्या मागणी वाढून पुरवठा कमी झाल्यामुळे टोमॅटोची किंमत वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. काही दिवसांपुर्वी टोमॅटो १०० रुपये प्रति किलो होता तर आता या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.

काल मुंबई दिल्ली या ठिकाणी 200 रुपये प्रति किलो टोमॅटोची किंमत मोजावी लागत आहे. देशातील उत्पादक राज्यात अतिवृष्टीमुळे टोमॅटो पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

राज्यात काही ठिकाणी 170 रुपये द्यावे लागत आहे. दिल्लीत काही दिवसांपुर्वी टोमॅटोचे दर कमी होत होत्या परंतू पुरवठ्या कमी असल्यामुळे पुन्हा टोमॅटोची किंमत वाढली. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोची किरकोळ किंमत बुधवारी 203 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली, तर मदर डेअरीच्या सफाल रिटेल आउटलेटवर त्याची किंमत 259 रुपये प्रतिकिलो होती. आता वाढत्या टोमॅटोच्या किंमतीमुळे गृहीणींने टोमॅटोचा वापर कमी केला आहे.