प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं..

243

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रायगडमधील कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे समजते.

तिथे ते मृतावस्थेत सापडले आहेत. ९० च्या दशकांमध्ये बहुचर्चित तमस या दुरदर्शनवरील आपल्या कारकिर्दिला प्रारंभ केला होता. त्यानंतर १९९४ मध्ये १९४२ लव्ह स्टोरी या चित्रपटाने त्यांनी स्वतंत्रपणे बॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रारंभ केला. यानंतर बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून त्यांची अल्पावधीत ख्याती झाली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दित लगान, जोधा-अकबर, देवदास, प्रेम रतन धन पायो आदी चित्रपटाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.