संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपने (BJP) सत्ता मिळवली असून आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यां पक्षाचा पराभव झाला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले आहे. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचे धोरण अवलंबू शकते. या निकालातून आता विरोधक काय धडा घेणार हे पाहावे लागेल.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-207तृणमूल काँग्रेस- 80काँग्रेस -02डावे पक्ष- 02इतर-02एकूण जागा-293
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल
द्रमुक- 74अण्णाद्रमुक-53टीव्हीके-107इतर-00एकूण जागा-234
केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल
काँग्रेस यूडीएफ आघाडी-102डावी आघाडी -35इतर-03एकूण जागा-140
आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-102काँग्रेस- 19इतर-05एकूण जागा-126
पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- 18काँग्रेस-06इतर-06एकूण जागा-30









