राज्यात उन्हाचा कहर ! वादळी पावसाचाही इशारा

107

राज्यातील हवामान सध्या अतिशय गंभीर वळणावर असून आज 10 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट अतिशय तीव्र असल्याने तिथे उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

उन्हाच्या तडाख्यासोबतच विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत आज ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.