प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांनी “पद्मश्री पुरस्कार” नाकारला.

53

भुनवेश्वर – प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे पुरस्कार स्विकारण्याची ही योग्य वेळ नसल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.

गीता मेहता यांनी एक पत्रकार परिषदेत बोलताना भारत सरकारने मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं, याचा मला खूप आनंद आहे. पण, मी हा पुरस्कार स्विकारू शकत नसल्याचे मेहता यांनी नम्रपणे म्हटले आहे. देशात लवकरच लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे हा पुरस्कार स्विकारल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. ज्यामुळे मी आणि सरकार दोघांसाठी मानहानीकारक ठरेल. याबाबत मला नेहमीच खेद वाटेल, असेही मेहता यांनी म्हटलंय.

गीता मेहता यांनी शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान जाहीर करण्यात आला होता.