भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीची झोप उडवणारी महत्वाची घटना घडली आहे. सपा-बसपाच्या युतीची घोषणाच आज अखिलेश आणि मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून केली. मायावतींनी पत्रकार परिषदेची सुरुवातच ‘गुरु चेले की नींद उडने वाली है” असा टोला लगावत केली.

उत्तरप्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीची आघाडी झाल्याची घोषणा अखिलेश यादव, मायावतींकडून यांच्या कडून करण्यात आली.
उत्तर प्रदेशातल्या ८० जागांपैकी बसपा ३८, सपा ३८ जागा लढणार. २ जागा इतरांना आणि अमेठी, रायबरेली या २ जागा काँग्रेसशी कुठलीही आघाडी न करताच सोडल्या आहेत. भाजपचा गेम यशस्वी होवू नये म्हणून ह्या जागा सोडण्यात आल्या आहेत. असे स्पष्टीकरण मायावती यांनी दिले…
काँग्रेस सोबत निवडणूक युती केल्याचा फायदा आमच्या सारख्या पक्षांना होत नाही. काँग्रेस पक्षाची मतं आमच्या उमेदवारांना हस्तांतरित होत नाहीत, १९९६ मध्ये बसपाने आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सपाने याचा अनुभव घेतला आहे असा खुलासा ही मायावती यांनी केला आहे.








