बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सुरूच आहे. सलग सहा दिवस संप सुरू असतानाही प्रशासन आणि कामगार संघटना मध्ये कोणताही मार्ग निघत नाही. ह्याचा नाहक फटका मुंबई करना बसत आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तर दुसरीकडे बेस्ट बस रस्त्यावर धावत नसल्याने मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत.
या संपाबाबत आतापर्यंत शांत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता प्रशासन आणि सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे आता मनसे रस्त्यावर उतरणार असल्याने या बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे बळ वाढणार आहे.
मनसेचे संदीप देशपांडे यांचा इशारा
“आज बेस्ट संपाचा सातवा दिवस, अजूनही संप मिटवण्यासाठी सरकारकडून हालचाल नाही. ह्या सरकारच नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. उद्यापासून नाक दाबायला सुरवात करणार! सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती, त्यांनी तयार राहावे!”, असे ट्वीट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यामुळे उद्या पासून मनसेची नेमकी भूमिका आणि आंदोलन बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून त्यांच्या मागण्या पूर्ण करून देतील का? तसे मुंबई करांचे हाल संपतील का? हे उद्याचा दिवस ठरवेल..








