“विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन”: बौद्ध जनतेचं प्रतिक.

84

आज ८ जानेवारी २०१९. आज बौद्ध धर्मीयांसाठी सर्वात महत्वाचा दिवस. आज ‘१३८ वा’ जागतिक धम्मध्वज दिन आहे. त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. बौध्द धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी जगातील बौध्दांचे जनतेचे एकच प्रतिक असावे, या विचाराने सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल, महास्थविर भदन्त गुणानंद, भदन्त सुमंगल, बौध्द विव्दान जी. आर. डिसिल्वा इत्यादींनी मिळून निळा, पिवळा, लाल, पांढरा व केशरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ‘जागतिक बौध्द धम्मध्वजा’ ची निर्मिती केली आहे. तदनंतर ह्याच ध्वजाला विश्व मान्यता प्राप्त झाली. याला पाली भाषेत ‘षड् रोशनी ध्वज’ किंवा ‘धम्म ध्वज’ असे म्हणतात. हा धम्मध्वज केवळ ध्वज नसून बौध्द धम्माचे नेतृत्व दर्शविणारे तसेच बौध्द धम्माचे आचार, विचाराचे प्रतिक आहे.

ह्या धम्मध्वज मधील पाच रंग आणि त्यातील प्रत्येक रंगाचे महत्व

१) निळा :— शांती व प्रेमाचे प्रतिक.

२) पिवळा :— तेज व उत्साहाचे प्रतिक.

३) लाल :— शौर्य व धैर्याचे प्रतिक.

४) पांढरा :— शुध्दता व निर्मळतेचे प्रतिक.

५) केशरी :— त्याग, दया व करुणेचे प्रतिक.

“जागतिक धम्मध्वज दिन” म्हणून बौध्द अनुयायींनी आपले घर, विहार, स्मारक, भवन, धम्म परिषद, धम्म सभेचा मंच, धम्म उत्साहाचे स्थळ इत्यादी ठिकाणी सर्वांत उंच असा फडकवावा. ‘धम्म ध्वज’ – बुध्द पोर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, धम्मक्रांती दिन व धम्म परिषदांचे वेळी ध्वजस्तंभावर फडकवून वंदना करावी, असे जागतिक ठराव देखील घेण्यात आले आहेत.