सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सिडनी येथील चौथी कसोटी ड्रॉ झाली, आणि तब्बल ७१ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियात भारताने प्रथमच कसोटी मालिका विजय मिळवला. चार सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारत ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणारा जगातील पाचवा आणि आशियातील पहिला संघ आहे. यापूर्वी इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली आहे.
दरम्यानस पावसामुळे मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. कमी प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवशीही फक्त ६४.४ ओव्हरचा खेळ झाला होता. तर तिसऱ्या दिवशीही १७ ओव्हरचा खेळ कमी झाला होता.








