मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीवर राज यांनी व्यंगचित्राद्वारे टीका केली आहे. ही मुलाखत म्हणजे मोदींनीच मोदींची घेतलेली मुलाखत असल्याचा टोला राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राद्वारे लगावला आहे. मुलाखत घेणारे मोदी मुलाखत देणाऱ्या मोदींना ‘बोला काय विचारु?’ असे विचारताना दिसत आहेत. ‘एक मनमोकळी मुलाखत’, असे या चित्राला राज यांनी शीर्षक दिले आहे.
2019 च्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. काळा पैसा, नोटाबंदी, जीएसटी, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव यासारखी अनेक प्रश्ने स्मिता प्रकाश यांनी मोदींनी विचारली होती. परंतु हि मुलाखत “फिक्स” मुलाखत होती अशी खरपूस टीका विरोधकांनी केली आहे.








