आरंभ : युवा प्रभाव

55

मुंबई: नवे वर्ष, नवे स्वप्न, नवे रूप घेऊन पुन्हा एकदा वाचकांच्या सोबतीला “युवा प्रभाव” येत आहे. युवा प्रभाव च्या सोबतीने आपण आजच्या धावपळीच्या जगात सदैव अपडेट राहाल, अशी ग्वाही आपणास देत आहोत. युवा प्रभावने नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली, भ्रष्टाचार, अन्याय अत्याचार ह्यावर कडाडून प्रहार केले. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिला. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी आम्ही पुनः सज्ज आहोत. मध्यंतरीच्या काळात काही अनेक चढउतार आल्यामुळे आम्ही कार्यरत नव्हतो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. नवा संकल्प आणि नवा साज घेऊन आम्ही सज्ज आहोत. बातमीचा प्रत्येक मागोवा, दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी. पडत्या काळात जो विश्वास आपण दाखवलात असाच विश्वास राहू द्या असा विश्वास युवाप्रभावचे मुख्य संपादक प्रफुल कांबळे यांनी व्यक्त केला आहे. सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.