IAS तुकाराम मुंडेंची मुलुंड मध्ये धडक कारवाई; गुप्ता चणा भंडार ला ठोकले टाळे..

1123

मुंबई : IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून राज्यभरात धडक कारवाई करत आहेत. हॉटेलांपासून ते रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभाग बेधडक कारवाई करत आहे. अशीच एक कारवर मुलुंड येथे करण्यात आली.

मुलुंड पश्चिम येथील डम्पिंग रोड, गौतम नगर परिसरातील गुप्ता चणा भंडार या दुकानात एफडीएने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

पाणी पुरीची विक्री करणाऱ्या आस्थापनाविरोधात ही कारवाई करण्यात आली असून तपासणीदरम्यान दुकानात अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक परिस्थिती आढळून आली. त्यानंतर मुलुंडमधील ‘गुप्ता चणा भंडार’चा व्यवसायावर टाळं ठोकण्यात आलं.

विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादकाचं नाव, उत्पादन दिनांक आणि मुदत संपण्याची तारीख नमूद नसल्याचे निदर्शनास आले असून एकूण 114.2 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अन्नसाठ्याची अंदाजे किंमत 8,290 इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये 68 किलो भाजलेले चणा, 19.5 किलो बारीक शेव, 18 किलो मुरमुरे, 5.2 किलो पाणीपुरीची पुरी आणि 3 किलो शेवपुरीच्या पुऱ्यांचा समावेश आहे.