मुंबई: समाजमाध्यमांवर विशेषतः व्हॉट्सअपवर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याचे प्रसारित वृत्त पूर्णतः चुकीचे आहे. भारत निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत लोकसभा निवडणुकांबाबतचा कार्यक्रम घोषित केलेला नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिले आहे.








