सपा-बसपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढू: राहुल गांधी

135

दुबई : लोकसभा निवडणुक २०१९ साठी अखिलेश यादव यांचा सपा आणि मायावतींच्या बसपाने केलेल्या महाआघाडीमध्ये काँग्रेसला स्थान देण्यात आलेले नाही. उत्तर प्रदेशमधील महाआघाडीमधून काँग्रेसला बाहेर ठेवण्याच्या सपा बसपाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. समाजवादी पक्ष आणि बसपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण ताकदीने लढू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सध्या दुबई दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी आज दुबई येथे मीडिया सोबत संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, ”बसपा आणि सपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची ताकद वाढवायची जबाबदारी आमच्यावर आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूक लढेल,” असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला .