अयोध्या प्रकरण: एका न्यायमूर्तींची माघार; आजही सुनावणी टळली…

59

नवी दिल्ली – अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी झाली नाही. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी २९ जानेवारीला होणार आहे.

न्या. उदय लळीत यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेतली. न्या. लळित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता २९ जानेवारीला नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. याच खटल्यामध्ये यापूर्वी वकील म्हणून काम केल्यामुळे लळीत यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठावर आक्षेप नोंदवला. धवन यांनीच न्या. उदय लळित यांचाही मुद्दा उपस्थित केला. राजीव धवन यांच्या आक्षेपानंतर न्यायाधीश उदय लळीत यांनी या घटनापीठातून माघार घेतली.