मुंबई, पुण्यातील घरांच्या किमतीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ; घरांच्या किमती महागल्या..

317

Mumbai : मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) घरांच्या किंमतींमध्ये प्रत्येकी तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे, मुंबईत घर खरेदी करण्याचे तुमचे नियोजन असेल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

देशात रिअल इस्टेट संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. या अहवालामध्ये मुंबई, पुण्यासहित अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, आणि दिल्ली या शहरांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये घरांची सरासरी किंमत ही प्रतिचौरस फूट 10,100 ते 10,300 रुपये इतकी झाली आहे. तर पुण्यातील घरांच्या किमती या प्रतिचौरस फूट 5,600 ते 5,800 रुपये झाल्या आहेत.

एप्रिल ते जून या कालावधीमध्ये घरांच्या किंमतींमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये एकूण 80,250 घरांची विक्री झाल्याची माहिती आहे.