हास्यसम्राट, ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

472

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन झाले आहे. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खालावत चालली होती. त्यांच्यावर कॅनडामध्ये उपचारही सुरु होते. पण अखेर सिनेसृष्टीतील एक हास्यसम्राट यांनी जगाचा निरोप घेतला. कादर खान गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. उपचारासाठी ते कॅनडामध्ये मुलाबरोबर राहत होते. आज पहाटे नव्या वर्षाची सुरुवात या वाईट बातमीने झाली आहे.

कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान कादर खान यांचे निधन झाले.