ZEE मराठी शो महाराष्ट्राची किचन क्वीन स्पर्धेची विजेता ठरली मुलुंडकर सुनिता सातपुते..

392

गुणवत्ता ही आता कोणाची मक्तेदारी नाही,त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कष्ट करण्याची तयारी त्यागाची भावना आणि जिद्दीने शिकण्याची तयारी यामुळेच आज सर्वच क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत,त्या अनेक क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करून दाखवीत आहेत. मुलुंडची रहिवासी गुजराती समाजाच्या घरी स्वयंपाक करणारी घरकामगार महिला सुनिता सातपुते हीने झी मराठी शो महाराष्ट्राची किचन क्वीन स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविला.

खर कार्य तेच आहे की जे समाज हिताला सर्वोपरि स्थान देते.म्हणून म्हणतात कि समाज सेवा म्हणजे दुधारी तलवारीच्या धारेवर चालणे असते. आणि हे काम काही दुर्बलांच काम नाही. प्रत्येकाच्या जिवनात संघर्ष जरूरी आहे,विशेष महिलांच्या जिवनात तो सर्वत जास्त असतो. आणि घरकाम करणाऱ्या महिलाच्या जीवनात तो किती असेल विचार करा!.पण घर कामगार महिलांना संघटीत करून त्यांचे बचतगट निर्माण करून त्यांना सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्या कडून प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वताच्या पायावर उभे करण्याचे आव्हान सर्वच महिला घेत नाही.पण सुनिता संजय सातपुते, भारती फडणीस, अनिता बेल्हे यांनी ते घेतले. सुनिता संजय सातपुते यांनी घरकाम करून मुलामुलीचे शिक्षण पूर्ण करून घर कामगार महिलाच्या संघटनेसाठी जिद्धीने कष्ट त्याग करून काम करायला लागली. तेव्हा महिला तिला नांव ठेवत होते, लोक त्याला समाज सेवा म्हणतात.जे लोक समाज सेवेत आपला मूल्यवान वेळ देत असतात. त्या लोकांना तन-मन-धनाने सहकार्य करावे आणि काहीच जमत नसेल तर शांतपणे पाठींबा देवुन सहकार्य करा,चांगल्या समाज कार्यांना पुढे न्यावे. संगठित व्हा आणि संघर्ष करा.

सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांना संघटित करण्याचे काम सुनिता संजय सातपुते यांनी केले त्याला समता फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. घरकामगार महिलांचे बचतगट तयार करण्यात आले,आजच्या घडीला दोनशेच्या वर बचतगट तयार केले आहेत. महिलांच्या अनेक स्पर्धेत त्या आता हिरीरीने भाग घेतात.त्यात समता महिला बचतगट आणि घर कामगार महिला प्रमुख संघटक सौ.सुनिता संजय सातपुते यांनी झी मराठी शो महाराष्ट्राची किचन क्वीन स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला (प्रथम क्रमांक फ्रीज) त्यांचे आता घरकामगार महिला बचतगट महिलांना स्वाभिमान वाटत आहे.तिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याबद्दल सुनिता सातपुते,संजय सातपुते यांना सागर तायडे,चंद्रकला तायडे यांनी घरी बोलावून शाल व पुस्तक देऊन सत्कार केला.